STORYMIRROR

Vaishnavi Mohan Puranik

Romance

3  

Vaishnavi Mohan Puranik

Romance

समुद्राच्या लाटा

समुद्राच्या लाटा

1 min
338

समुद्राच्या लाटा आसुसल्या होत्या किनाऱ्याशी भेटायला

त्याला आपला प्रेम आवर्जून सांगायला

कधी भेटेल आपल्याला किनारा

ही हुरहूर प्रत्येकीच्या मनात होती

कधी कळेल त्याला आपला प्रेम

ही चिंता प्रत्येकीच्या मनाला खात होती

कधी होऊ आपण एक

ही घालमेल प्रत्येकीच्या मनात होती

कधी सम्पतील हे दुरावे

ही काळजी प्रत्येकीच्या मनाला खात होती

कधी दूर होतील हे विरहाचे दुख

ही तगमग प्रत्येकीच्या मनात होती

कधी जुळेल आपली जन्मांतरीची गाठ

ही आस प्रत्येकीच्या मनाला खात होती

आज लाटा किना-याला भेटल्या

त्यांचे दुरावे संपले प्रेम वाढले

जुळले बंध प्रीतीचे खिळले नाते जन्मांतरीचे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance