माझी शाळा
माझी शाळा
वैष्णौ बाल मंदीर पासून सुरु झाला प्रवास
ते महारानी लक्षमीबाई हाई स्कूल पर्यंतचा सहवास
लाखे मॅडमनी दिली पाठीवर कौतुकाची थाप
लोखंडे मॅडमला आम्ही घातली प्रेमानी साद
आठवण येते मनाला त्या दिवसांची
हृदयात साठवून ठेवलेल्या अमूल्य क्षणाची
किती मस्त होता तो काळ काय ती वेळ
एकमेकांसोबत खेळत होतो निरनिराळे खेळ
नदी पहाड़, लपाछपी गमती जमती
हुतुतू खो खो आणि पकडा पकडी
त्यात प्रियंका, मोना आणि मी आमची होती मस्त गट्टी
कधीच झाली नाही आमची कट्टी बट्टी
जसे जसे वर्ग पुढे वाढत गेले
नवनवीन मित्र मैत्रिणी सोबत येत गेले
नेहा,रंजना,निशी, माधुरी यांची मिळाली साथ
आकाश,भूपेंद्र,हरीश यांची तर विचारु नका बात
हे बदमाश रोज नवनवीन खोड्या करत होते
आमची दामछाक करुन सोडत होते
राग ही यायचा पण मजा काही वेगळी होती
शाळेतल्या दिवसांची बातच काही और होती
गॅदरिंग बालमेला यात तर वेगळीच कमाल
सोबत मिळून सगळे करत होतो मस्त धमाल
अजून ही मनाच्या कोपऱ्यात आहे ते क्षण जपून
शाळेतील दिवस आठवता येते डोळे भरुन
काय आणि किती सांगू मी शब्दच नाही
ते रम्य बालपण आता परत येणार नाही
शाळेतील ते दिवस होते किती खास
मिळेल का पुन्हा एकदा तो निरागस सहवास
