STORYMIRROR

Vaishnavi Mohan Puranik

Romance Others

3  

Vaishnavi Mohan Puranik

Romance Others

भेट

भेट

1 min
288

कालची आपली भेट थोडी वेगळी होती

कारण तू तिथे असून तिथे नव्हती

तू माझ्याशी बोलत तर होती पण

तुझं लक्ष वेगळीकडे केंद्रीत होता

कारण तू शरीराने माझ्या सोबत होती

पण मनाने नव्हती

कालच्या तुझ्या वागण्यात बोलण्यात

नेहमीप्रमाणे ती आपुलकी नव्हती

एक वेगळेपणा होता

कालच्या तुझ्या सहवासात मला 

अनओळखीपणाच जास्त जाणवत होता

कालच्या तुझ्या शब्दांना

तुझ्या मनाची सोबत नव्हती

तुझे ओठ काही वेगळे बोलत होते

नजर काही अजून सांगत होती

कालची तुझ्या चेहऱ्यावरची

ती उदासी मला जाणवली होती

कारण काल तू काही न बोलता

खूप काही बोलून गेली होती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance