STORYMIRROR

Vaishnavi Mohan Puranik

Romance

3  

Vaishnavi Mohan Puranik

Romance

अबोल प्रेम भावना

अबोल प्रेम भावना

1 min
275

मला काही सांगायचे आहे पण कसे सांगू 

मला काही बोलायचे आहे पण कसे बोलू

एकांतात सतत तुझाच विचार करते 

माझे डोळे नेहमी तुलाच शोधते


दिवस रात्र तुझेच स्वप्न बघते

तुझ्यापुढे स्वत:ला ही विसरते 

तुझ्या गोड आठवणीत रमते

मनातल्या मनात स्वत:शी हसते


पण तू समोर आला की मला काही कळत नाही 

काय बोलावा नेमका तेच सुुचत नाही 

घाबरुन मी इकडे तिकडे पाहते 

मग लाजून तिथून निघून जाते 


पुढच्या भेटीत नक्की सांगेन तुला 

हवा आहेस नेहमी सोबत तू मला

पण दरवेळी नेमके हेच घडते

तुला समोर बघून मी बावरते


जे सांगायचे ते मनात राहते

आणि माझी अबोल प्रीत अबोलच असते

कसे सांगू मी हे तुला सांग तू 

कसे बोलू मी हे तुला सांग तू 


तुझ्या आठवणीचे सुुगंध माझ्या भोवती दरवळते

तुझ्याच साठी आता मी जगते

कळेल का तुला कधी सख्या साजना

माझ्या या अबोल प्रेम भावना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance