तुझं माझं नातं...
तुझं माझं नातं...
सूर्य आणि सूर्यफूल
तसं तुझं माझं नातं
एक आपल्या नादात,
दुजं मान वळवतं.
झोका बांधला झाडाला
तसं तुझं माझं नातं.
रेटा देऊन भुईला
उंच उंच झोके घेतं.
चाक फिरे आसावरी,
तसं तुझं माझं नातं,
एक घट्ट एका जागी,
दुजं फिरत रहातं.
ऊन्ह पाऊस श्रावणी
तसं तुझं माझं नातं,
पाणी डोळ्यात दाटता
गाली हसू उमटतं.
एक समजूतदार,
दुज्या काहीच कळेना.
असं माझं तुझं नातं
या इथेच मार खातं...