Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Aishwarya Ballal

Comedy Others

3  

Aishwarya Ballal

Comedy Others

घरातील Quarantine ...

घरातील Quarantine ...

1 min
102


मस्त-मज्जेत चालू होती life !

तेवढ्यात tension द्यायला आली चीनची corona wife !!

15 दिवस सुट्टी म्हणून तसे सगळेच होते आनंदात !

पण त्यात आणखी दिवस add होत गेल्यावर सगळ्यांचीचं तोंडं गेली गगनात !!

सुरुवातीचे दिवस जरा गेले family बरोबर पार्ट्या करण्यात !

आता रोज-रोज तिचं तोंडं बघून प्रत्येकाची डोकी फिराल्यात !!

पहाट तरी पहिलीच नाही direct सूर्यबाबा प्रकटतो !

आणि रामायणाचा एक chapter मग सकाळीच उघडतो !!

काहींचे जीभेचे चोचले पुरवायला म्हणून चालू आहे बनवायला खाऊ !

पण त्यासाठी किराणा शोधायला होतं मग नाकीनऊ !!

स्वतःकडं बघितलं की वाटतं खायला कार आणि भुईला भार !

मग मोबाईलकडे बघून जरा वाटतो मनाला आधार !!

मोबाईल हातात घेतला की असं वाटतं, अरेच्चा! आताच चार्जिंगला लावलं होतं !

एवढा मोबाईल use करूनही म्हणतो मग,आज जरा नेटचं स्पीड कमीच होतं !!

काहींचा माशा मारणचं झालंय big time spend !

त्यात आगीत तेल ओतायला मॅम म्हणतात मग लगेच assignment करा send !!

जेवण, धुनं-भांडी नुसत्या कामाचा सुकाळ !

तरी एवढंच काम केलंस म्हणून घरच्यांच्या तोंडावर नेहमीच दुष्काळ !!

रात्र लवकर संपत नाही दिवस लवकर उजडत नाही !

आणि कॉलेजची आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही !!

बास झालं आता हे , lockdown लवकर संपवा मोदी !

आमच्या चवळीच्या शेंगच्या पोरी भुईमूगाच्या बनण्या आधी !!

त्या कोरोनाला ढिगभर शिव्या देत आहेत प्रत्येक घरात !

आता सगळ्यांची एकंच इच्छा याला ठेच लागून पडू दे परत चीनच्या दारात !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy