Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Aishwarya Ballal

Others

3  

Aishwarya Ballal

Others

ओढ पावसाची

ओढ पावसाची

1 min
35


मज आवडे फुलांचा तो थाट !

वाजे हाती बांगड्यांचा खणखणाट !

लागे नव्या वस्त्राचा आस्वाद !

पायी पैंजनाचा नाद !

परी हवा निसर्गाचा स्वाद !

सुंदर ते चित्र सुगंधी तो वास !

एका तरुणीला वाटे मग पावसाची आस !!


आज हा गृहपाठ !

उद्या तो शिकणार पाठ !

रोजच चाले शब्द-आकड्यांचा घाट !

नाही केला तर गुरुजींशी गाठ !

मनी आली मग चिंताच दाट !

वाटे शाळेची बंद पडावी वाट !

रोज करूनि अभ्यास !

एका बालकाला वाटे मग पावसाची आस !!


दिसभर करी फकस्त वणवण !

लागलीय खरी पैक्याची चणचण !

माझ्या लेकरांना नाही काडीची वैरण !

डोळ्यापुढे उभारे ओसाड ते रान !

कधी संपणार हे नव्यानं पेरणं !

माथी उभी हाय दुष्काळाची वैरीण !

तरीबी जोमानं उठून मी धरीनं पीकाचा ध्यास !

एका बळीराजाला वाटे मग पावसाची आस !!


सहन होईनात या उन्हाच्या झळा !

पाण्याचाही स्पर्श नाही गार पडायला गळा !

त्याच्या शोधाणं अंग पडलंय गळून !

तरीबी सूर्यबाबा अजून ओकतोय ऊन !

पोटाच्या खळगीसाठी हिंडावं लागतं त्याला !

झाडाविना छाया नाहीच त्या मुक्या जीवाला !

उन्हाच्या या झळीनं घेता येईना त्याला श्वास !

एका प्राण्याला वाटे मग पावसाची आस !!


प्रत्येकाच्या ओढीची कारणं आगळी !

रोजच्या नियमाला कंटाळलीत सगळी !

डोक्यात रचलीय शीण-थकव्याची मोळी !

साऱ्यांनाच हवी आहे या त्रासाची गोळी!

आता मायेच्या ओलाव्याचा निसर्ग देणार सुवास !

पर सजीवाला वाटे मग पावसाची आस !!


Rate this content
Log in