Cartoon Life...!!!
Cartoon Life...!!!


कधीकधी वाटे नको ही खोटी दुनिया अन् ते कुत्सित भाव!
आपलंही असावं एक ढोलकपूरसारखं गाव!
नको तो डांबरी रस्ता, असावा फक्त मातीचा सडा!
पिझ्झा-बर्गरपेक्षा मिळावा शिवानीच्या धाब्यावरचा वडा!!
ढीगभर जनतेपेक्षा असावे छुटकी, राजू, जग्गूसारखे मित्र!
संकटावर भीम करणार कुबुश-कुबुश हवीत त्यावर हसणारी ढोलू-भोलूसारखी पात्रं!!
राजा इंद्रवर्माच्या जनतेचा कारभार पाहत जावंसं वाटतं रमून!
कारण Real life पेक्षा Cartoon is अफलातून!!
नको पैसा-अडका हवा एक डोरेमॉनसारखा साथी!
त्याच्या गॅझेटमुळे पळून जाईल मग सगळीच भीती!!
Surprising दुनियेपेक्षा भारी वाटतं, जेव्हा सिझुका म्हणते, तुम कितने अच्छे हो नोबिता!
Emotional drama पेक्षा मस्त असतात नोबिताचे येणारे फवारे, तो रडता-रडता!!
आपल्यामागे निंदा करणाऱ्यांपेक्षा हवेत जियान-सुनियोसारखे वैरी!
आणि सगळ्यात भारी सिझुका & कितरेसू एकत्र आल्यावर नोबिताचे तोंड बघण्यात मजा येते खरी!!
नोबिता Homework कधी पूर्ण करेल या आशेची वाट बघत बसावं वाटतं दंगून!
कारण Real life पेक्षा Cartoon is अफलातून!!
असावी आपलीही एखादी Tom & Jerry सारखी जोडी!
लाभावी त्यात मोटू & पतलूच्या मैत्रीसारखी गोडी!!
नि:स्वार्थी मित्रांनी मासूमपणे भरावी आपली झोळी!
सोबतीला मिळावी हातोडीसारखी ज्ञानामृताची गोळी प्रत्येकवेळी!!
वाटतं नको ते शहरीकरण अन् नको ते Digitalization!
त्यापेक्षा मिळावं या जखमेवर Animationचं हे Lotion!!
इथे Suicide, छेडछाड ना होतो खून कोणाच्या हातून!
म्हणूनचं Real life पेक्षा Cartoon is अफलातून!!