STORYMIRROR

Aishwarya Ballal

Inspirational Others

4  

Aishwarya Ballal

Inspirational Others

भाकरी...

भाकरी...

1 min
459

जोंधळ्याच्या पिठाने परात गेली अवखळून!

त्याचा आस्वाद घ्यायला पाणी धावतच आले मग खळखळून!!


ना तेल-तुपाची आस!

ना चटणी-मसाल्याचा हव्यास!!


मायेच्या दोन स्पर्शांनी गेला तो गलबलून!

हसतच राहिला धक्काबुक्कीनं गेला जरी तो गुदमरुन!!


चुलीच्या पुढे शुल्लकच तो गॅस!

चार लाकडांनी भरूनच जातो त्याचा व्यास!!


म्हणता-म्हणता गोल आकार उमटला!

मग तापत्या तव्याकडे आनंदाने सरसावला!!


काया जणू चटकून गेली होती त्या तप्त आगीच्या झळेने!

तेवढ्यात परत कोमल स्पर्श केला त्या पाण्याने!!


एवढीशी मायेची उब त्याला बास होती कर्ण बनायला!

कारण तो दुसऱ्यासाठी तयार झाला होता स्वतःची प्राणहुती द्यायला!!


इतरांना जगवणार म्हणून फुगला तो अभिमानानं!

आणि लगेचच तव्याची जागा घेतली ताटानं!!


किती तो नशीबवान जसा काय त्यानं प्राण सोडला!

पुनर्जन्मच जणू पाहताक्षणी पौर्णिमेच्या चंद्राचंच रूप बनला!!


जेव्हा पडतात याच्या मुखात दोन घास!

जणू होतो अमृताचाच भास!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational