STORYMIRROR

Parag Raje

Comedy Others

3  

Parag Raje

Comedy Others

नजरनाम्याचा नजराणा

नजरनाम्याचा नजराणा

1 min
49

सर्व वाचक / श्रोते ह्यांना नम्र अभिवादन करून 


पॅन्डेमोनियम उर्फ घोळूनघोळूण लांबणलावे  ऊर्फ गलितगात्र आजोबा आपल्याला एक महामंत्र देत आहेत .. 

 द्रुष्ट किंवा नजर काढताना पुटपुटण्याचा महामंत्र 

---*---

द्रुष्ट मिष्ट 

जित्त्या मेल्यांची

भूता खेतांची

किड्या मुंग्यांची

वाटे तिटेची

कुत्र्या माजरांची

काळ्या केसांची 

भरल्या दुडीची

चिमण्या पाखरांची 

गुरा ढोरांची

पशू पक्षांची

आजूबाजूची

आल्या गेल्यांची 

फुला पानांची

काट्या कुट्याची

देठ अन वेलींची

झाडाझुडपाची

लहान थोरांची

शेजाऱ्या पाजाऱ्यांची

 उभ्या बसल्यांची

ओल्या सुक्याची

दऱ्या खोऱ्यांची

नदी नाल्यांची

ओढ्या विहिरींची 

घरातल्यांची बाहेरच्यांची

सर्व देव दानव मानवांची

द्रुष्ट निघो

पापणी चे डोळे फुटो

सगळा त्रास निघून जाऊ दे 

बाळ लिंबोणी वाढू दे ! 

थू ! थू ! थू ! थू ! थू ! 


---*---

नजर अथवा द्रुष्ट काढते वेळेस पुटपुटण्याचा महामंत्र.. आपल्या पान सुपारीच्या डब्यातून पॅन्डिमोनियम ऊर्फ गलितगात्र आजोबा मुखशुद्धी साठी हा महामंत्र पेश करत आहेत. . 

तो पण इतका फूलप्रूफ कि कोणत्याही निगेटिव्ह शक्तिची काही ऊपद्रव करण्याची काय बिशाद ! 


---*---

" नजरनामा नजराणा " संपूर्ण !


लेखकाचा शुभ संदेश -  सर्वांचे शुभ कल्याण होवो. 



ह्या गोष्टीचा/ निबंधाचा / कवितेचा काॅपिराईट लेखकाकडे राखीव आहे .


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy