जागा जागा!
जागा जागा!


जागा जागा शोधत फिरु या
बिल्डर बिल्डर भेट घेऊया
चटईक्षेत्र मुद्रा शुल्क
भेद सारे जाणून घेऊया
जागा जागा शोधत फिरु या
दाखवायची किंमत ती किती?
नगदी किती कागदी किती?
प्रत्यक्ष कधी मिळेल ताबा?
हिशोब सारे आता करुया!
जागा जागा शोधत फिरु या
माळा कितवा? लिफ्ट आहे का?
पॉवर पाणी पार्क आहे का?
पार्किंगची सोय आहे का?
शेजारी तरी शांत आहेका?
जागा जागा शोधत फिरु या
स्टेशनपासून दूर हे किती?
बाजार मंडई जवळ किती?
शाळा कॉलेज दवाखाने
अगदीच वनवासी नाही ना!
जागा जागा शोधत फिरु या
रेरा फेरा ईडी यांचा
नाही न कुठला ससेमिरा?
बँक लोनही सुलभ होईल
असा प्रकल्पच निवडूया!
जागा जागा शोधत फिरु या