मुजोर मैत्रीण
मुजोर मैत्रीण
मूळ कवीवर्य आदरणीय कै ग. दि. माडगूळकर ह्यांची क्षमा मागून
मूळ गीत
देहाची तिजोरी
भक्तीचाच ठेवा
उघड दार देवा आता
उघड दार देवा // ध्रु //
विडंबनगीत
मैत्रीण मुजोरी
गर्वाचाच टेंभा
हाकला हिला बाई आता
हाकला हिला आता
पिते कॉफी मचामचा ही
जात आयतोबाची
मनी सदैवचि असे
आस खादाडीची
सरावली रोजची ही
लाज ना जीवाला
हाकला बाई आता हिला
हाकला बाई हिला
सदैवचि गप्पा मारी
हसण्यात दंग
असे हाती मोबाईल
सिनेमाचे रंग
अशा मैत्रिणीचा संग
मला का मिळावा ?
हाकला हिला बाई आता
हाकला बाई आता
गाणे हिच्या मुखामधले
तार स्वरातील
ऐकूनिया किटली पाळी
बधीर हो मन
वेळोवेळी वागणुकीचा
जाब विचारावा
हाकला हिला बाई आता
हाकला हिला आता