STORYMIRROR

Priyanka Kumawat

Romance

3  

Priyanka Kumawat

Romance

कळलेच नाही

कळलेच नाही

1 min
428

चालता चालता वाटेवर

कधी तू भेटला कळलेच नाही

तुझ्यासवे प्रत्येक क्षण

नवा का वाटे कळलेच नाही

बोलता बोलता आनंद

कधी जगला कळलेच नाही

डोळ्यात आलेले पाणी

कधी तू पुसले कळलेच नाही

माझ्या या वाटेवर

कधी तू हरवलास कळलेच नाही

मी कधी तुझ्या सावलीत

निवारा शोधायला लागले कळलेच नाही

जीवन माझे तुझ्या सवे

कधी प्रफुल्लित होत गेले कळलेच नाही

एकांत हा माझा संपुनी

सवय कधी तुझी झाली कळलेच नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance