STORYMIRROR

Priyanka Kumawat

Romance

4  

Priyanka Kumawat

Romance

सारे काही सोडून

सारे काही सोडून

1 min
249

सारे काही सोडून

चल परत एक होऊया

झाले गेले विसरून

जीवन नव्याने जगूया


रोजचेच रूसवेफुगवे

परत एकदा भांडू या

एकमेका समजवण्या

त्याच युक्त्या करूया


पुन्हा त्याच त्याच

चुका करूया

जराश्या दुराव्यावर

तेच अश्रू ढाळूया


रोजचेच ते टोमणे

एकमेकां मारूया

आठवून ते पुन्हा

खळाळून हसूया


कोणाच्याही नकळत

चोरून चोरून भेटूया

गुलाबाचे फुल देऊन

प्रेम व्यक्त करूया



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance