पोटापुरता पैसा...
पोटापुरता पैसा...
पोटापुरताच नकोच पैसा, हवी फुकाची पोळी
कोणा आणि किती गंडवू, तरी भरेना झोळी || धृ ||
हवा तितका घेईन पैसा, अडवून वेळोवेळी
फसवून घेतो मी पैसा, मतीच माझी काळी
मलाच माझी कशी शोभते, सोन्याची ती थाळी || १ ||
गाड्या, घोडे हवेत मजला, बंगला छे... बंगले देतील छाया
सोने, चांदी अन् रत्नांनी, सजते माझी काया
गोठविणाऱ्या नकोत नोटा, करू या त्यांची होळी || २ ||
पैसा अन् श्रीमंती, याहून, हट्ट नसे गा माझा
खेचून घेईन, लुबाडीन तुज, तू रंक अस की राजा
पैशा वाचून जगणे, ही तर पस्तावाची पाळी || ३ ||