STORYMIRROR

Stifan Khawdiya

Inspirational

3  

Stifan Khawdiya

Inspirational

बदलली माणसे आता

बदलली माणसे आता

1 min
228

इतिहास भूतकाळात संपला 

तिथे तोल माणुसकीचा सुटला 

बदलली माणसे आता क्षणाला

इथे आदर्शाचा सागर आटला


हरएक बाब स्वार्थाची योजना 

पदोपदी फसवणे बिनधास्त 

नसे वाली सत्याला कोणी कुठेच 

झाला यात सत्याचा उघड अस्त


झाला फितुर,भरवसा दुर्दैव

नसे सुरक्षित रे आई बहीण  

लटकला बळीराजा फासावर  

आता जगणे दारिद्रय अर्थहीन 


जातपात, पुढारी, राजकारण 

मानव मानवातचं दुभंगला

हिच ती खरी किड मानवतेत 

इथे कलंक जगण्याला लावला


नाही एकी नाही समंजसपणा

नको बदल कसलाच स्वस्तात 

नसे घेणे न् देणे फक्त स्वस्वार्थ

आहे जो तो आपल्या अहंकारात


काळ बदलला पिढी बदलली 

वेळेनुसार ज्ञान ही बदलले

ज्ञानानुसार तंत्रज्ञान वाढले

तंत्रज्ञानात संस्कृती विसरले


नवा काळ आधुनिक परंपरा 

जगणे झाले मुके क्षणाक्षणाला 

प्रतिष्ठेसाठी सतत उलाढाल 

महत्व आहे फक्त ठक सत्तेला


पुन्हा घडेल का योग्य तो बदल

होईल जाणीव खऱ्या अस्तित्वाची

का हे असच चालू राहणार रे

समतेच्या छायेत झळ एकीची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational