हेच खरे स्वातंत्र्य
हेच खरे स्वातंत्र्य
हे विश्वची माझे घर असावे
सर्वधर्मसमभाव, बंधुता
कुठेही कसलेच भय नसावे
जगात अवघ्या फक्त माणूसकीचे राज्य असावे
पुरे झाला आतंक शत्रुत्वाचा
नाश व्हावा भ्रष्टाचार आणि स्वैराचाराचा
नांदो इथे सुख, शांती, समाधान
स्वातंत्र्याचा रोज व्हावा सन्मान
अधिकार इथे प्रत्येकाला स्वच्छंदी जगण्याचा
का मग तुरुंगवास नशिबी पोपटाच्या ?
प्रत्येक कळीने बेधुंद दरवळावे
तिला कुस्करणाऱ्या हाताचे छेद व्हावे
झाडे- वेली , पशु- पक्षी मुक्त उधळण निसर्गाची
आस्वाद जीवनाचा भरभरून घेऊ
स्वातंत्र्याची प्रचिती कणाकणात रूजवू
ॠण खऱ्या अर्थाने ईश्र्वराचे फेडू
