प्रेम रंगात रंगले
प्रेम रंगात रंगले
1 min
193
लाली केशर आकाशी
मधु धुंद गार वारा
चहुकडे तो वसंत
मोहरली जणू धरा.....
दरवळ पानोपानी
दाटे मोहर पिवळा
उधळण सप्तरंगी
गेला बहरून मळा....
आला बहर यौवनी
मदहोश मी रमणी
सख्या चाहूल लागता
झाले घायाळ हरणी.....
गुज ह्रदयी खुलता
स्वप्नमनी मी गुंतले
झंकारली प्रीत वेडी
प्रेम रंगात रंगले.....
गाली गुलाब फुलता
ॠतु मोहरून आले
प्रिया मिठीत शिरता
तनमन शहारले......
