पहिला पाऊस
पहिला पाऊस
दाटून आले मेघ नभी,
माजले काहूर अंतरंगी...
आठवणींचा धुंद वारा ,
घोंघावतो मन तरंगी....
अंगणात माझ्या नाचती मृगधारा,
फुलून आला मनाचा पिसारा....
रूप हे घनाचे सावळे मोहक,
ओथंबून आला भावनांचा किनारा....
साठवू किती मेघ वर्षाव,
आतुरले हे अधिर मन...
भिनला गारवा अंगी माझिया,
धुंद स्पर्शाने शहारले तन....
स्तब्ध उभी मी झेलित वारा,
मोहरून आले स्पर्शात ओल्या...
खुणावते श्यामल मिठी ही मजला,
खट्याळ धारा चुंबून गेल्या....
फुलून आली हिरवळ मखमली,
सृष्टीकाराने जणू नक्षी काढली....
आसमंती कशी लाली चढली,
लाजरी अवनी गर्भार झाली...
गंध मातीचा श्वासात भिनला,
पिसाट वारा अंगात शिरला...
बहरून आले उनाड यौवन
