चंदनाची शेज
चंदनाची शेज
चंदनाची शेज सजली पार्थीवाला जाळण्या,
डोंब घाटावर उभा तो आसवे का गाळतो
डाव तो मांडोनी अपुला सावलीशी वेगळा,
बोलतो वारा उन्हाला मी तुला रे पोळतो
कस्तुरी येता फुलोनी रानजाई बहरते,
रातराणीच्या सवे मी सांज डोळी माळतो
माग नुरला पावलांचा परत येण्या अंगणी,
चांदण्यांचा कोष आता दश दिशांना उजळतो
वात इवली लाजवीते भास्कराला तळपत्या,
पश्चिमेला अस्त होता दीप तो तेजाळतो
