आस तुझी या व्याकुळ जीवां
आस तुझी या व्याकुळ जीवां
पहिल्या पावसाची सर,
भासे तुझी मादक नजर. ....
करी देह चिंब चिंब,
जणू तुझी मिठी अलवार.....
शहारली ही जमीन,
गंधाळला आसमंत.....
झाली सुगंधित काया,
तुझी रिमझिम बरसात.....
काळ्या मेघाचा महिमा,
आला धावत भेटाया.....
संपली विरहाची घडी,
झाली तृप्त तिची काया....
पहिल्या पावसाचा जोम,
झाले हिरवे सारे रानं....
अंकुरली धरणी आई,
शोभे भरल्या ओटीनं....
पहिल्या पावसाच्या परी,
सख्या येरे तू धावूनी....
झाले चिंब तनं मनं,
घे रे टिपून अधरांनी....

