STORYMIRROR

Neha Khedkar

Inspirational

3  

Neha Khedkar

Inspirational

बाबा..!

बाबा..!

1 min
236

 बाबा...म्हणजे...!


एक अजब, हवहवस असलेलं व्यक्तिमत्व , ज्याची उपस्थिती तो असून नसल्यासारखं दर्शवतो , तो बाबा..!


आपल्या आयुष्यात देवाने निर्माण केलेलं एक सुंदर व्यक्ती रेखाटन म्हणजे बाबा...!


स्वावलंबी, स्वाभिमानी, खूप कष्टाळू, आपल्यासाठी प्रत्येक गोष्टीत अडजेस्टमेंट करणारा म्हणजे बाबा...!


बोट धरून जगात पहिले पाऊल उचलताना सावरून आयुष्याचे धडे देणारा, आपल्या पाठीमागे आपला आधार बनून उभा असणारा म्हणजे बाबा...!


ज्याला कधी त्याच्या भावना व्यक्तच करता येत नाही, त्याला मनभरून रडणे माहितीच नाही असे समजणारा, त्याचं मनातलं कधीच आपल्याला न सांगणारा म्हणजे बाबा...!


आई रागावली की आपल्याला कुशीत घेणारा, डोळे पुसून छानशी पापी देणारा, आपले सगळे हट्ट पुरवणारा म्हणजे बाबा...!


ताठ मानेने वागायला शिकवणारा,आत्मविश्वास निर्माण करून पुढे जायला सांगणारा ,आपल्या प्रत्येक अडचणीत मार्ग दाखवणारा म्हणजे बाबा...!


ज्याची आठवण आली की डोळे टचकन भरून येतात, तो आपल्यातून हरवलेला आता कधीच परत न येणारा... हे कटू सत्य सांगणारा म्हणजे माझा बाबा😢...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational