एकतेची मशाल
एकतेची मशाल
ऐक्याचा सूर
ऐकेना कोणी
करी विटंबना
होई सारी हानी
पैशांच्या ठेवी
झाल्या रिकामी
संस्था झाल्या कैक
बनल्या पुरोगामी
कधी न फुलला
माणसांचा मेळा
हरवला सारा
गुणवंतांचा मेळा
कुणी गाईल का
एकतेची गाथा
परमेश्वर चरणी ठेवी
संकटकाळी माथा
हातात घेऊन चला
क्रांतीची मशाल
एकतेच्या नात्याने बनवू
भारत नवा विशाल
