Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vedashree Vyas

Inspirational Others

3  

Vedashree Vyas

Inspirational Others

माझे मीच होते !

माझे मीच होते !

1 min
248


मनात आशा ठेवुनी त्या रात्री मीच तेवत होते 

आशेच्या त्या किरणांमुुुळेच आकाश उजळले होते

असे झाले कसे ? हे तू मला मला विचारू नकोस मला विझवणाऱ्या हवेत तुझेच कण होते


समुद्रकिनारी केलेले स्वप्नातले ते महल मी बांधिले होते

बांधलेल्या त्या महालात काल माझे स्वतःचे अस्तित्व होते

असे झाले कसे ? हे तू मला विचारू नकोस 

माझे महाल तोडणाऱ्या लाट तुझाच वेग घेत होते


आयुष्यपुष्प हाती घेतांना सगळे काटे मी काढले होते

वाटचाल मार्गाने करतांना पुष्प गंधाळले होते

असे झाले कसे ? हे तू मला विचारू नकोस 

पुन्हा वाटचाल करताना काट्यांची दिशा दाखवणारे तुझेच बोट होते


तू सगळे मला अपयशी ठरवण्याचे प्रयत्न जरी केले

तरी माझे सारे स्वप्न मात्र साकार झाले

असे झाले कसे ? अवाक् होऊनी मला विचारू नकोस 

रस्त्यातील प्रत्येक खचखळग्यांवर मात करणारे माझे मीच होते , माझे मीच होते....!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational