STORYMIRROR

Vedashree Vyas

Others

3  

Vedashree Vyas

Others

निसर्गाचे रंग

निसर्गाचे रंग

1 min
445

पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे मन हे माझे

अन् एक-एक थेंबाएवढे विचार माझे

एकसोबत ओघळतांना सुंदर दिसे


सूर्य हा लपंडाव खेळे कृष्णनभांसवे 

अन् खेळता-खेळता इंद्रधनु येती तेथे

वाटे असे की, त्यासवे आपण सुद्धा समरस व्हावे


फुलपाखरे ही इंद्रधनुसवे खेळूनी रंग घेऊनी आले 

निसर्गाचे सौंदर्य हे डोळ्यात टिपावे

अन् अम्लान सौंदर्याचा आस्वाद घेतच रहावासा वाटे


निसर्गाचा रंग हा किती आगळा-वेगळा 

स्तब्ध राहते मन पाहुनी खेळ सगळा

खरचं निसर्गाचा किती चैतन्यमय सोहळा


सगळ्यांनी एकदा तरी मोबाईलच्या जगातून बाहेर यावे

निसर्गाची किमया बघून एकदा तरी त्यासवे एकरूप व्हावे 

न् का न होई निसर्गासोबत खेळून पहावे !


Rate this content
Log in