आई-बाबा (सुनीत)
आई-बाबा (सुनीत)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
तुम्ही माझ्या अंधारातील वात
जन्मभर असू द्याल ना, हाती-हात माझा ?
तुम्हीच तर आहात खरा दागिना माझा
पुढच्या सातजन्मात राहील ना आपलं हेच नात ?
तुम्हीच दिलीय मला खरी संस्काराची शिदोरी
कशी पडू देणार हो , मी त्याला तडा ?
विश्वास ठेवा माझ्यावर , तुमच्या आयुष्यात टाकेल सुखाचा सडा
सातजन्मात कशी विसरणार माझी वचने सारी ?
काटेरी वळणांनवरून तुम्ही मला चालायला शिकवलंय
मग , आयुष्यातील वळणांवर तरी कशी अडखळणार ??
आयुष्य कसं जगावं हे मला पण जमतंय
मार्गाने जाता-जाता तरी कशी मी अचुकतेकडे वळणार?
मी असल्यावर कधी नाही येणार तुमच्या डोळ्यात पाणी
आई-बाबा , विश्वास ठेवा तुमच्याच लेकीची आहे ही वाणी !