वृद्ध : तो आणि ती
वृद्ध : तो आणि ती
ती म्हणाली ,
मनाला या वाजवी तुझा आवाज
तुलाच भेटाया होते मी उत्कंठीत
तुला अंकित करण्यासाठी वापरावी कोणती रीत ?
ओठांवर या , तुला बघूनी येतात गीत
येथूनच झाली होती ना आपल्या प्रेमाची सुरवात ?
नंतरचं तू दिला होतास ना माझ्या हातात-हात !
तू माझा झाल्यावर अभूतपूर्व
तू माझा झाल्यावर अश्रुतपूर्व
तू माझा झाल्यावर अदृष्टपूर्व
आयुष्यात ओढावले प्रसंग अविस्मरणीय
तू जेव्हा मला हो म्हंटलेस ,
तेव्हा असेच झाले !
तुझ्या येण्याने वाटे आल्हाददायक जीवन
मी तर तुझीच नादिष्ट
तू माझ्या आयुष्यात असल्यावर झाले मी निरिच्छ
कारण , मला तुझेच व्यसन&nbs
p;
हेच माझ्यासवे घडले जेव्हा तू आला माझ्या जीवनात
अन् त्यावेळी तू माझा झालास पूर्णपणे न् हक्कानं
आपलं तरुण वयातील प्रेम तुला पण आठवतंय ?
जे मी हे ओंजळभर साठवलंय ??
तो म्हणाला ,
हो , का नाही आठवणार ? मी पण ते साठवलंय
पापण्यांमगे त्या क्षणांना लपवलंय !
वृद्ध जरी झालो आता तरी ते प्रेम तसच आहे
तसंच आहे म्हणून नाही तर तसंच राहणार आहे .
तुझ्यासवे लोटली ती ५० वर्ष आता किती आठवाव
प्रेमाला वय कुठे असतं ? वृद्ध झालो म्हणून त्यात काय ?
उर्वरित आयुष्यात पण असंच प्रेमप्रवाहात आपण वाहू या !
आतापर्यंत कधी साथ सोडली नाहीस , आता पण असेचं हातात-हात ठेवू या !!