STORYMIRROR

Vedashree Vyas

Others

3  

Vedashree Vyas

Others

रावण

रावण

1 min
324

रावणाला स्वतः उभं करून

आपण रावणालाच जाळतो

त्याच नाव बदनाम करून

स्वतःच राक्षस बनतो 


त्यानं केलं सीतेच अपहरण 

पण स्वतःची मर्यादा त्याने ओळखली

तुम्ही भर रस्त्यात मुलींची अब्रू काढून

स्वतःची मर्दानी विकली


वंशाच्या दिवट्या साठी

घरातील लक्ष्मी तुम्ही गमावता

सभयपणाचा मुखवटा लावून

असभयता काय असते दाखवून देता


रावण होता तो , 

बहिणीसाठी देवाशी झुंजला

तुम्ही जवानीतील मर्दानी दाखवून

 स्वतःच्याच बहिणींचा बलात्कार करता


चारही वेदांतर असणारा

तो श्रेष्ठत्व गमावून बसला

त्याला राक्षस म्हणून म्हणून

तुम्ही स्वतःतला राम मात्र दाखवला


Rate this content
Log in