STORYMIRROR

Vedashree Vyas

Others

4  

Vedashree Vyas

Others

आयुष्य एक गॅजेट

आयुष्य एक गॅजेट

1 min
341

जेव्हा आयुष्य नावाचं gadget पडलं माझ्या हाती

तेव्हापासून सुरू झालीये धडपड फक्त त्याच्यासाठी

हाती आल्यापासून त्याच्या अंकित मी झाले

न् काही दिवसांपूर्वी storage full असे नोटिफिकेशन आले

मग काय होणार ? सुरू झाला प्राक्तनाचा खेळ

त्यालाच clean करण्यात जातोय माझा वेळ

कोण-कोणते application करणार होते uninstall

कारण , त्यात जास्त काहीच नव्हते केले install

आठवणींच Unlimited GB च Memory Card टाकलं होतं 

पण , तेही नाही पडलं पुरेस.....

दोनच application होते त्यात आनंद आणि दुःख

तरी पण storage full झालं होतं अख्ख

आनंद करायचा होता update

पण , तेव्हा सतत येत होते please wait 

Settings मध्ये जाऊन केली setting सेट

अन् भलतंच काही होऊन बसल ,

दुःख uninstall करायला गेले की लिहून येत होते free मध्ये buy to get

वाट बघतेय आता कधी upload होतात new features 

न् कसे होतात त्याचे चांगले वाईट असर......

                


Rate this content
Log in