त्या वळणावर
त्या वळणावर
चालताना उलगडत गेली
ती, नागमोडी वळणाची वाट"
असंख्य काटे वळणावर
मनी फुलांची आस "!
अगणित वर्दळ तरीही शांत
मनात काहूर माजलेले
प्रश्नही तेच रोजचे असलेले ..
अनवाणी पाय अन आभाळ फाटके ..!
नात्याचे रेशिबंध विरत चाललेले
माया ,ममता , सारेच विखुरले
दाह "दिसेना कसा मग ?
सारे मोहाचे पसारे "!
चालतं वाटेवर गर्दी मागे सारत
..एकटाच त्या वाटेवर मी "!
गावं मागेच राहिले '
गोंगाट ..तोच पुन्हा वळणावर
आसवे डोळ्यात आली..
नागमोडीचं वळण ..
वाटेवर पुन्हां मी "!
