Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Kavi Sagar raje

Others

5.0  

Kavi Sagar raje

Others

अंतयात्रा

अंतयात्रा

1 min
527


आज माझ्या अंत्ययात्रेला.. 

सारं गाव जमलं होतं... 

बऱ्याच दिवसांनी माझ्या घराचं,, 

अंगण भरलं होतं 


आज माझ्या अंतयात्रेला.. 

सारं गाव जमलं होत... 

भावकी, मित्र, सहकारी,...सारेच जमले होते.. 

विशेष म्हणजे ज्यांचं माझ्याशी वैर होतं 

त्यात ते सुद्धा होते. 

कारण माझ्या शोकसभेचं आमंत्रण सर्वांसाठी होतं


मी पाहत होतो त्या प्रत्येक चेहऱ्याला.. 

मला छळनारे, माझी लायकी काढणारे, माझ्या गरीबीची लखतरे वेशीवर टांगणारे.. माझा प्रत्येक वेळी फक्त तिरस्कार करणारे,.... 

अंगणात एका कडेला.. उभे होते केविलवाणा चेहरा हातात घेऊन.. 

आपल्या वागण्याच प्रायश्चित करत 


मागच्या रांगेत तेही होते.. ज्यांनी मला आधार दिला. संकटात लढायाचं सामर्थ्य दिल... माझ्या कर्तृत्वाची दखल घेत.. त्यांच्या डोळ्याती अश्रू.. वाहत होते.. मी नसण्याच्या उणीवेत...


सगळा परिसर... आक्रोश, किंकाळ्या,.. नी गजबजला होता.. 

एकीकडे.. तिरडी सजवली जात होती.. 

तो ...  माझा अखेरचा निरोप समारंभ.. होता.. 

...अखेरचे काहीच तास शिल्लक होते.. माझ्याकडे..

आता मी नसणार हे अंतिम सत्य. 


माझी नजर.... स्थिर झाली.. माझ्या अर्धांगिनी वर..माझ्या प्रेतावर टाहो फोडत होती..मी जाऊ नये म्हणून विनंवणी करत होती.. तिचा चेहरा अगदी विद्रुप झालेला पाहून.. मन सुन्न झाल...तिचा सातजन्माचा साथी.. मी 

संसाराचा डाव अर्ध्यात टाकून.. जाताना अपराधी मन भूतकाळी रमल.. 

तीच नटणं, मुरडणं,.. अधीर होऊन माझी वाट पाहणं... 

सारं,, सारं संपलं होत.. 


....संध्याकाळी पप्पा खाऊ घेऊन येतील.. म्हणून अंगणात वाट पाहणारी.. माझी लेकरं..पप्पा बोलत नाही,, म्हणून आईला मिठी मारत.. अश्रू वाहात होती..

त्यांचे केविलवाणे चेहरे पाहून जळत्या निखाऱ्या.. जाळतोय मी... त्यांना बिलगून घट्ट छातीशी धरावं.. त्यांच्याशी बोलावं 

म्हणून यमाला हट्ट करू लागलो... 

नाहीच उठता आले..मला 

प्रेत तिरडीवर साखळदांडाने जखडून ठेवलं होतं...


Rate this content
Log in