ती रात्र
ती रात्र
आठवते का गं तुला,
ती रात्र पावसाने सजलेली...
ओली तू अन् ओला मी,
पावसात साडी चिंब भिजलेली...
येताच जवळ मी तुझ्या,
पाहुनी जरा मला लाजली...
अन् तुझ्या हरिणी डोळ्यात,
आज प्रणय स्वप्न पाहिली..
स्पर्श करता नाजूक उरास,
तु जरा शहारुन गेलीस...
तू ना राहिली तुझ्यात,
माझ्यात तु हरवून गेलीस...
चुंबता तुझ्या गुलाबी ओठास,
मन मदहोश होत गेला...
तु्झ्या ओठ्याच्या पाकळ्याचा,
गंध माझ्या श्वासात भरला...
हवेत गारवा असतानाही मग,
ह्दयात आग पेटत होती
'तु' अन् 'मी' अबोल केवळ
श्वास आपले बोलत होती

