शाळा
शाळा
काल अचानक स्वप्न पडले
स्वप्नात माझ्या शाळा आली माझी
आपुलकीने सगळी विचारपूस झाली ..
कसा आहेस रे तू ..!"
शब्दांने मात्र उर भरून आला
दाटलेल्या कंठाने फक्त ठीक आहे मी बोलता आलं ..
वाटलं मलाच मग बालपण मात्र
बरंच मागे राहून गेलं .."
तू कविता करतोस ऐकलं य मी ..?
हो ..! जगाच्या परीक्षेत अनुभलेले क्षण त्याचं
शब्दांची गुंफण करतो बस " तिचं कवितेचं रूप घेते
छान !
माझ्यावर का नाही केलीस कधी ?
आता मात्र काहीच बोलवेना ! काही वेळ दोघेही शान्त होतो ..
अरे तुला माहिते ..गेल्या वर्षपासून शाळा बंद असल्याने
खुप एकटेपणा आलाय ..दरवर्षी नवीन ऍडमिशन असतात
जुने जाऊन नवीन चेहरे येतात ..त्यावेळेस द्विधा मनस्थिती असते माझी ..
तुम्ही दूर चाललात म्हणून काहूर पेटते मनात ..!
जुनी पाखर भरारी घेतात , आठवणी मात्र ठेऊन जातात तश्याच ..
कधी कधी आठवणीच ओझं वाटतं , शेअर करायला तुम्ही नसतात ना ! म्हणून
तुला आठवत का रे .. जुन्या गावातून नव्या गावात आले मी..तुम्हाला किती आनंद झाला होता !"
Ncc च्या पिरेडला ही श्रमदान करयाचे तुम्ही मुलं आठवलं की अश्रू येतात रे अजूनही खूप गुणी होतात रे बाळांनो ..
तुम्ही लावलेली ती झाडं किती डेरेदार झाली आता ..
त्याच्या भोवताली घुटमते आजही ..तुमची ही अशीच प्रगती व्हावी मागणे मागते देवालाही ..
अखंड बालपण समोरून जात माझ्या ..किती दांड होता तुम्हीं.. सारखा धनगड धिंगा असायचा
गणिताचा जाम कंटाळा इंग्लिश च्या नावाने तर बोंब असायची "
पाटील मॅडम चें रोजचे बोलणे खान तुझ्या पथ्यावरच होतं म्हणा .. एवढं करून कसाबसा काठावर पास व्हायचास ..
हायस वाटायचं बघ तरीही .."
हो नाही जमायचं मला "
शाळेतले गणित कधी जमले नाही " पण आयुष्याचे गणित जुळवतोय आजही "
तुमच्यापैकी काहीजण आवर्जून भेटतात , काहींच्या बातम्या येतात कानी .
माझ्या लेकी ,मुलं नातवंड सगळ्या खबरी असतात बर मला ... ऐकून खूप बरं वाटतं . रे
सुखी राहारे मुलांनो .. शेवटी एव्हढच काय ते बोलून गेली ..
आज स्वप्नात शाळा आली ..
पुन्हां एकदा आशीर्वाद देऊन गेली ...
