STORYMIRROR

Kavi Sagar chavan

Others

4  

Kavi Sagar chavan

Others

चिंब करतोय स्वतः ला पाऊस

चिंब करतोय स्वतः ला पाऊस

1 min
243

नमस्कार मित्रांनो नुकतेच पावसाचे आगमन झाले आहे 

त्यामुळे भरपूर आंनद घ्या . 

कविता कशी वाटली नक्की सांगा आणि सोबत लाईक आणि शेअर जरूर करा.


चिंब करतोय स्वतःला "


बघ ना ? 

पावसाचं अस विचित्र वागणं बघवत नाही मला!"


पाऊस देखील आजकाल 

   खुळ्यासारखा वागतो

पुन्हां पुन्हा तुझ्या आठवणी जगवतो 

मी भिजावं म्हणून पत्रावर नाचतोय 

त्यामुळे पावसाचं आणि माझं जमत नाहीं !


खर तर मी गेली काही पावसाळे 

भिजण्याची तसदीचं घेतली नाहीं 

कुणास ठाऊक पण ! उच्छाह नसतो मला

 मठ्ठ गोळ्यागत खिडकीत उभा राहतो


  आणि चिंब करतोय स्वतःला 


पाने ,फुले , गवताची पाती , 

चिंब भिजत असतात 

गल्लीतली डबके , गटारी , वेशीबाहेरील

नाले ओसंडून वाहतात ." 

पण मी ? नाहीच ह "! भिजत 

आपला मंग्या नेहमी आग्रह करतो !

मी धाडकन दरवाजा लावून घेतो 


  आणि चिंब करतोय स्वतःला 


तुझ्यासोबत कधी शेवटचा भिजलो 

आसेल तेव्हडचं "

आता फक्त खिडकीत उभं राहून 

प्राजक्ताला आवर्जून पाहतो ओल होताना 

 

    आणि चिंब करतोय स्वतःला 


ऑफिसला जाताना होत कधीतरी भिजणं 

अर्थातचं तेंही माझ्या मर्जीविना 

तुझ्या सोबतच भिजणं काही वेगळंच होतं "!

त्याला याची सर नाही आता फक्त पाहतो 

 रस्त्यावर ची डबकी भरून वाहताना


   आणि चिंब करतोय स्वतःला 

 

सहसा पाऊस आला कि आडोसा शोधतो 

गार वाटतं म्हणून चहा घेतो 

 हातात चहा असतो डोळ्यात पावसाच्या सरी 

आठवणीत रमतो तुझ्या 

इतकी वर्ष झाली एकच विचार करतो 

 काय उपमा दयावी आपल्या प्रेमाला ?


   आणि चिंब करतोय स्वतःला !"


Rate this content
Log in