लढा कोरोनशी
लढा कोरोनशी


हातच काम गेलं आणि सारच..
बदलू लागलं..
गरीबाच्या चुली विझू लागल्या..
जगणं अवघड होऊ लागल.
भीतीने पोटात गोळाच आला..तिच्या
जर माझ्या बाळाला कोरोना झाला.. नाही... नाही..
क्षणात अश्रू गालावर ओघळले..
बाळ छातीशी घट्ट मीठी मारली...
एक एक दिवस जीवघेना वाटायचा...
जसं जसा शहरात आकडा वाढायचा..
एक दिवस आधीच..
घरमालक शिव्या देऊन गेला...
मार्ग कुठला दिसेना...
किराणा, औषधं, लाईटबील, घरभाडे..
....प्रश्न मात्र अनुउत्तरित होते.
गरीबाच्या नशिबी अवहेलनाच होती..
घरच्या बाहेर पॉझिटिव्ह होण्याची भीती..
तर, घरात राहून उपासमारी.. हातावरच पोट..
पण तिने स्वतःला खम्बिर केल होत.
घरातच आता तीच आयुष्य बंदिस्त होत...