रातराणी
रातराणी
1 min
477
श्वासात फुलांच्या उमलती
सुगंधित रातराणी पाकळ्या
मी मिटून डोळे घेते तेव्हा
होती मंतरलेल्या रात्री मोकळ्या
हा कालचा प्रवास आजवर
डोळ्यात तरळतो स्वप्नातून
की उतरतो चंद्र उशीवर
अन् चांदण्या पेटती श्वासातून
इतक्यात मध्यरात्र उलटून
उलटा चालू होत असे प्रवास
वाऱ्यासम वाहतो काळ अन्
तू भेटल्याचा उजाडतो दिवस
तीच हुरहूर... घालमेल मनाची
जशी फुलण्याआधी होते कळीची
पहाटेस आठवणीनं मागून हाका
अन् पुन्हा पहाट होते स्वप्नाची
