शब्द माझे दैवत
शब्द माझे दैवत
शब्दातुनी व्यक्त होती
भाव माझ्या मनीचे
शब्दातूनीच मज कळे
भाव माझ्या अंतरीचे
शब्द शब्द रचुनी
तयार झाले काव्य
वाक्य एकत्र होऊनी
बनले महाकाव्य
शब्दांसारखा सोबती
असे न कोणी
भावना व्यक्त करती
कहानी शब्दातुनी
शब्द असती आधार
नाते सांभाळण्याचा
शब्दच करती घात
नात्यातील ठेवीचा
शब्द उमटले कागदावर
बनली काव्याची पंगत
शब्दरंगाचे भाव उमटती
बनती शब्द माझे दैवत
