गुढीपाडवा
गुढीपाडवा
गुढी सजली रेशमी वस्त्राची
जोडीला गोडी मधुर गाठीची
हार फुलांचा सुगंध पसरवी
डहाळी कोवळी कडुलिंबाची।
कडू गोड सार्या आठवणी
अनुभव शिदोरी गतवर्षाची
आव्हाने नवी पुन्हा खुणावती
तयार होऊ पूर्ण शक्तिनिशी।
गुढी उभारून आरोग्याची
सुरुवात करू या नववर्षाची
गुढीपाडव्याचा सण मंगलदायी
घेऊन येवो नववर्ष सुखदायी।
