महाराष्ट्र आमचा
महाराष्ट्र आमचा
माती इथली लाल-काळी
तिलक समजून लावतो भाळी
परंपरा शौर्याची मनात भिनली
महाराष्ट्र आमचा, आम्ही मराठी!
डोंगर दऱ्यांची भूमि आपली
गड - किल्ले माणिक मोती
सागर फेसाळणारा अभिमान भारी
महाराष्ट्र आमचा, आम्ही मराठी!
नृत्य, गाणे, कलांची नगरी
ज्ञान, विज्ञान, उद्योग पंढरी
यशाची पताका विश्वात फडकली
महाराष्ट्र आमचा, आम्ही मराठी!
बुलंद विश्वास, निधडी छाती
पराक्रमाची आमच्या ख्याती
शिवरायांचे वंशज आम्ही
महाराष्ट्र आमचा, आम्ही मराठी!
