परीक्षा
परीक्षा
शिक्षण संपले, वाटले संपल्या परीक्षा
पण आयुष्य म्हणजे रोज एक नवी परीक्षा
शाळेच्या परीक्षेत विषय अन् अभ्यासक्रम होता ठरलेला
आता रोज नवा विषय, आणि अवघड प्रश्न परीक्षेला
परिस्थिती बनते परीक्षक, कसोटी आपली घेते
कधी सोपे तर कधी कुटप्रश्न, परीक्षेला ती टाकते
सोडवत जावे एकेक प्रश्न, मनोबल ठेवावे उच्च
अवघड प्रश्नांसाठी नेहमी, विकल्प ठेवावे सज्ज
पास नापासाची भीती नको, परीक्षा ही हिमतीची
संधी यातून मिळते आपल्याला, स्वतःला पारखण्याची!
