माय
माय
1 min
228
उदराच्या कोंदणात नऊ महिने जपते
जग आपल्याला दाखवण्या वेदनेलाही हरवते
बोट धरून चालवताना जगणे स्वतःचे विसरते
बाळासाठी माय सर्वस्व तिचे देते।
पाठीशी आपल्या खंबीरपणे रहाते
चुका पदरात घेताना कधी कठोरही बनते
काटे स्वतःसाठी ठेवून फुले आपल्याला देते
बाळासाठी माय सार्या जगाशी लढते।
दूर जाणार्या पिलाला हसून निरोप ती देते
उडावे त्याने आकाशी म्हणुन अश्रू स्वतःचे लपवते
नसते शाश्वती परतण्याची पण वाट त्याची पाहते
बाळासाठी माय दिव्याची वात होऊन जळते
