Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Neha Ranalkar

Inspirational

3  

Neha Ranalkar

Inspirational

गुढीपाडवा

गुढीपाडवा

1 min
242


गुढीपाडवा सण नववर्षाची

सुरुवात करू या उत्सव मोठा |

गुढीपाडवा सण मोठा नसतो

मुळातच आनंदालाही तोटा | |१| |


यंदाच्या वर्षी चैत्र प्रतिपदेला

आपण गुढी उभारू आनंदाची |

आरोग्यदायी लाभो सर्वांना जीवन

जागवू ओढ अंतरी स्वानंदाची | | २| |


मंगलदायी सूर्य किरणांचा सडा

दिसो रांगोळी कलात्मक दारांत |

तोरण मांगल्याचे प्रत्येक दारी

शांती सौख्य नांदो सर्व घरादारांत | |३| |


कडूनिंबाची पाने फुले साखरेचा

आणावा सुंदर हार तो शोधून |

वेळूच्या काठीवरचा उपडा ताम्र

कलश वस्र रेशमी दिसते शोभून | |४| |


सूर्योदयी शुचिर्भूत होऊन म्हणत 

ब्रम्हध्वजाय नम: गुढी उभारावी |

खेळीमेळीच्या वातावरणात वाद

त्यागून झालेली चूक सुधारावी | |५| |


स्वागत करून आनंद लहरींचे

नकारात्मक विचारांना घालवावे |

प्रेरणादायी विचारांच्या प्रसाराने

हताशांना ध्येयाकडे चालवावे | |६| |


Rate this content
Log in