STORYMIRROR

Shilpa Kodape

Inspirational

3  

Shilpa Kodape

Inspirational

सुनीत काव्य

सुनीत काव्य

1 min
456

धावपळ तारांबळ तिच्या मैत्रिणी

मिळेल का तिला थोडी विश्रांती?

घरच्यांच सुख हिच तिची श्रीमंती

म्हणुनच तर तिला म्हणतात गृहिणी.

 

ती सुद्धा करु शकते नोकरी 

तिच्या कष्टाची का नाही कुणाला जाणीव?

 डोळ्यात तिच्या कायम कौतुकाची उणीव.

तरी ही निवडते ती घर आणि घरची जबाबदारी.


सकाळी सगळ्यांच्या आधी उठणे

सगळ्यांचा विचार करते ,करून दुर्लक्ष स्वतःकडे

कसं जमतं तिला प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपणे?

प्रार्थनेत मागते सुख शांती घरासाठी देवाकडे.


कुटुंबासाठी जगणे, झटणे हिच तिची कहाणी,

संपूर्ण गृह जिचे ऋणी अशी ती गृहिणी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational