STORYMIRROR

Shilpa Kodape

Others

3  

Shilpa Kodape

Others

आजची स्त्री कशी असावी

आजची स्त्री कशी असावी

1 min
316

आजची स्त्री कशी असावी 

असावी स्वावलंबी माता जिजाऊ सारखी

जी घडवेल शिवबा आजही

आजची स्त्री कशी असावी

असावी सामर्थ्यवान सावित्रीबाई फुलें सारखी

जी लढेल स्त्री हक्कांसाठी आजही

आजची स्त्री कशी असावी 

असावी शुर राणी दुर्गावती सारखी

जी मिळवेल धुळीस पुरूषी अहंकार आजही

आजची स्त्री कशी असावी

असावी कणखर रमाबाई रानडे सारखी

जी करेल विनाश कुप्रथेचा आजही.

आजची स्त्री कशी असावी  

असावी सक्षम मदर तेरेसा सारखी

 जी जगेल स्वबळावर आजही.

आजची स्त्री कशी असावी 

असावी कर्तव्यदक्ष राणी लक्ष्मीबाई सारखी

जी राहील एकनिष्ठ कर्तव्या साठी आजही.

आजची स्त्री कशी असावी

असावी स्वतः ची अस्मिता जपणारी 

असावी स्वतः च स्वाभिमान राखणारी,

आजची स्त्री अशी असावी.


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍