प्रेम तुझे माझे
प्रेम तुझे माझे
धागा प्रेमाचा धागा सुखाचा
नातं तुझं माझं जणू बंध रेशमाचा
जुळता जुळता मन आपले जुळले
माझे मन माझे ना राहीले
कधी तुझे झाले हे माझे
मलाच नाही कळले
तुझ्या सोबत प्रत्येक क्षण नवा वाटतो.
प्रत्येक क्षणी तुझा सहवास हवा हवासा वाटतो,
प्रेम तुझे जणु मोती सागरातले
विश्वासाच्या धाग्यात दोघांनी मिळून गुंफले,
माझे रूसणे तुझे मनवणे, माझे रडणे तुझे हसवणे,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माझी अशीच साथ दे
हरवून स्वतःला तुझ्यात, मी तुझ्या प्रीतीचे गाणे गुणगुणते,
कधी सांगितले नाही तुला पण आज सांगते,
मी मनापासून तुझ्यावर प्रेम करते.

