बाप
बाप
1 min
451
बाप म्हणा किंवा वडील
अर्थ तर तोच राहतो,
चेहऱ्यावरचे भाव लपवतो,
पण प्रेम तो सुद्धा करतो.
भविष्याच्या काळजीपोटी
दिवसाची रात्र आणि रात्रीचा
दिवस करून तो जगतो.
हसण्या मागचं रडण कधी पाहिले नाही,
मनाच्या अफाट सागरात त्याने लपवले आहे काही.
दुःख,काळजी,चिंता तो ही करतो, म्हणूनच तर
श्रमाच्या निखाऱ्यांवर अनवाणी पायाने चालतो.
निखाऱ्यांचे चटके एकटाच सहन करतो,
परिवाराच्या सुखासाठी नेहमी झटतो,
त्या वाटेवर मिळणारे दुःख अगदी सहज झेलतो,
कष्टाची भाकर एकटा न खाता सगळ्यांना चारतो.
घराला खऱ्या अर्थाने घरपण देतो,
बाप म्हणा किंवा वडील अर्थ तर तोच राहतो.
