STORYMIRROR

Manisha Awekar

Inspirational

3  

Manisha Awekar

Inspirational

सौंदर्य

सौंदर्य

1 min
207

सौंदर्याची उपासक

मी नाही वरवरच्या

सद्गुणांची पूजक

मी सदा अंतरीच्या


दैवयोगे लाभतसे

सौंदर्य रंगरुपाचे

वाणी विचार आचार

सौंदर्य अंतरीचे


मुखवटे जगामधी

नकलीच सौंदर्याचे

आज आहे उद्या नाही

अशाश्वत प्रशंसेचे


सौंदर्य संवेदनांचे

कणवांचे सौहार्दाचे

सौंदर्य मनामनांचे

अंतरी अनुभूतीचे


सौंदर्य गिरीवनांचे

सौंदर्य धबधब्यांचे

सौंदर्य तरुवेलींचे

सौंदर्य नभताऱ्यांचे


साहित्य सुराभिषेकी

सौंदर्यगंध दरवळे

सूर रेशीमलडी

स्वरांतूनी बहरले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational