क्रांतिकारी लेखणी
क्रांतिकारी लेखणी
उगवली क्रांतीची नवी पहाट
दावण्या दीनांना खरी वाट
अवतरली क्रांतीची नवी ज्योती
कणखर अन् बहु मजबूत होती
जन्म लेखणीचा
नाश करण्या गुलामीचा
मार्ग तोचि धरला
क्रांतीचा मळा बहरला
मूकनायकातून लेखणी बहरास आली
दीनदुबळ्यांचीही सावली झाली
कष्टकरी कामकरी खूप आनंदित झाली
जेव्हा बाबांची लेखणी राज्यघटनेत आरूढ झाली
बाबांची लेखणी म्हणजे दुधारी तलवार
तीने केले अनिष्ट रूढी अन भेदभावाला ठार
त्या लेखनामुळे उज्ज्वल भविष्याचे स्वप्न साकार
मिळाला अनेकांच्या जीवना नवा आकार
