STORYMIRROR

DATTA VISHNU KHULE

Tragedy

3  

DATTA VISHNU KHULE

Tragedy

महागाई

महागाई

1 min
163

महागाईचा झटका...

जनसामान्यांना फटका,

खिशात नाही पैसा अडका....

कसे जीवन जगावे प्रश्न कडका ।।१।।


पेट्रोलचे दर आभाळाला भिडले,

डिझेल ,गॅस चे आलेखही उंचावर चढले...

साखर तेल म्हणतं आम्ही लयच भारी...

महागाईच्या चरख्यात माणूस 

पिळला जातोय ऊसापरी

अन चिपाड झालीय जनता सारी  ।।२।।


बेरोजगार हिंडे दारोदारी,

संतापात भांडणे घरोघरी...

शिक्षण घेऊन सुद्धा येतंय,

नैराश्यच कैकांच्या पदरी...

महागाईचे बघा किती हे काहूर ,

भरडली जात आहे त्यात जनता बेकसूर ||3||


शेतकरी कष्टकरी झालाय चकणाचुर,

महागाई होईल कधी आपल्यापासून दूर ?

करितो प्रार्थना भगवंताला नष्ट होण्या महागाई,

जीव झाला लाही लाही 

नष्ट होवो महागाईची खाई...||4।।

           



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy