STORYMIRROR

Manisha Patwardhan

Inspirational

3  

Manisha Patwardhan

Inspirational

गुढीपाडवा

गुढीपाडवा

1 min
251

नूतन वर्ष

स्वागत करू या

शुभेच्छा देऊ या

मनात हर्ष ...


गुढी पाडवा

सण असे मोठा

आनंदा न तोटा

मनी साठवा ...


दिन हा आज

चैत्र प्रतिपदा

घेऊ मोद सदा

सौख्याचा साज ...


प्रार्थना देवा

कोरोना जाऊदे

आरोग्य येऊदे

मोलाचा ठेवा ...


दुष्ट दुर्जना

घडवी शासन

देई आश्वासन

हीच प्रार्थना ...


कुंपण शेत

कां खाऊ लागले ?

गरिबांचे भले

तळास नेत ...


आज देवास

प्रार्थना करते

मनात स्मरते

असावा वास ...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational